Skip to main content

Shivache Vardan

          कलकत्ता हे मोठं शहर आहे ,आणि त्यातल्या एका भागांचं सिमला असं नाव आहे . कलकत्त्याच्या एका भागात राहणारी एक स्त्री -भुवनेश्वरी नावाची शिवाची रोज पूजाअर्चा करायची . ती प्रार्थना करायची ,'हे महादेवा,माझ्या मांडीवर घेण्यासाठी मला एक मुलगा दे .' भुवनेश्वरींना खूप मुली होत्या .पण आपल्याला पुत्र व्हावा अशी त्यांची खूप इच्छा होती. त्या रोज मुलासाठी  शिवाची प्रार्थना करायच्या . त्यांची  एक नातेवाईक वाराणसीला राहायची . त्यांनी तिला त्यांच्यासाठी विरेश्वर शिवाची पूजा वाराणसीत करावी , असं सांगितलं .
          भुवनेशवरी गाढ श्रद्धा आणि भक्तीनं प्रार्थना करीतच होत्या .  पुत्रप्राप्ती साठी त्या खूप व्याकुळ आणि शेवटी त्यांच्या पोटी मुलगा जन्माला आला . 
           हिवाळा संपतानाचे ते सणासुदीचे दिवस होते . त्या वर्षी १८६३ साली बारा जानेवारीला तो सन आला . त्या दिवशी काही स्त्रिया भुवनेश्वरिंच्या घरासमोरून जात त्यांनी शंखध्वनी होत असलेला ऐकला .  आपल्या मैत्रिणीकडे काय कार्यक्रम चाललाय ते पाहायला ताबडतोब त्या सर्वजणी आत गेल्या .
          आणि त्यांना काय दिसलं ? त्यांनी ते नवं जन्मलेलं मूल - भुवनेश्वरीच्या बाळाला पाहिलं गुटगुटीत बाळ होतं . त्याचा चेहऱ्यावर गोड हसू होतं . त्याचे डोळे मोठे होते ;इतक्या मोठ्या आणि सुंदर डोळ्याचं बाळ त्यांनी कधीच पाहिलेलं . ते कुणीतरी खास बालक असावं , असं त्यांना वाटलं .
           ह्या बाळाच्या वडिलांचं नाव विश्वनाथ दत्त होतं . ते वकील होते आणि खूप पैसे मिळवायचे .ते खर्चही तसाच करायचे ;त्यांच्याकडे उत्तमौत्तम कपडे होते , खूप नोकर- चाकर होते ,आणि एक घोडागाडी देखिलहोती . ते अतिशय मोठ्या मनाचे आणि उदार गृहस्थ होते . कुणी त्यांना पैसे मागितले तर तर तश्या गरजूंना ते त्यांचा पैसे देऊन टाकीत.
           १२ जानेवारीला १८६३ रोजी जन्मलेल्या मुलामुळे भुवनेश्वरी आणि विश्वनाथ  दत्त आनंदात होते .
भुवनेश्वरिंचा असा होता कि त्यांचा लहानगा मुलगा हे विरेश्वर शिवाचे वरदान आहे , म्हणू त्यांनी त्याचे नाव विरेश्वर असे ठेवले .पण अश्या लहानग्या बाळा करीता हे नाव फारच मोठे आहे ; नाही का ? म्हणून सगळेजण त्याला छोट्या सुटसुटीत अशा ;'बिले' या नावाने हाक मारू लागले .  

Comments