कलकत्ता हे मोठं शहर आहे ,आणि त्यातल्या एका भागांचं सिमला असं नाव आहे . कलकत्त्याच्या एका भागात राहणारी एक स्त्री -भुवनेश्वरी नावाची शिवाची रोज पूजाअर्चा करायची . ती प्रार्थना करायची ,'हे महादेवा,माझ्या मांडीवर घेण्यासाठी मला एक मुलगा दे .' भुवनेश्वरींना खूप मुली होत्या .पण आपल्याला पुत्र व्हावा अशी त्यांची खूप इच्छा होती. त्या रोज मुलासाठी शिवाची प्रार्थना करायच्या . त्यांची एक नातेवाईक वाराणसीला राहायची . त्यांनी तिला त्यांच्यासाठी विरेश्वर शिवाची पूजा वाराणसीत करावी , असं सांगितलं . भुवनेशवरी गाढ श्रद्धा आणि भक्तीनं प्रार्थना करीतच होत्या . पुत्रप्राप्ती साठी त्या खूप व्याकुळ आणि शेवटी त्यांच्या पोटी मुलगा जन्माला आला . हिवाळा संपतानाचे ते सणासुदीचे दिवस होते . त्या वर्षी १८६३ साली बारा जानेवारीला तो सन आला . त्या दिवशी काही स्त्रिया भुवनेश्वरिंच्या घरासमोरून जात त्यांनी शंखध्वनी होत असलेला ऐकला . आपल्या मैत्रिणीकडे काय कार्यक्रम चाललाय...