Skip to main content

Posts

Saptarshi

          आकाशात जे सात तारे आहेत ना,ते खरे तर सात महान असे ऋषी आहेत असे लोक म्हणतात ,हे ऋषी नेहमीच गाढ चिंतनात गढलेले असतात . ते ईश्वराचं ध्यान करीत असतात .           एकदा एक छोटा मुलगा तिथे गेला . तो एक गोड मुलगा होता . पण तो किती गोड आहे आहे ते पाहायला तिथे कोणीच नव्हतं कारण त्या सातही ऋषींचे डोळे मिटलेले होते .           अगदी ओळख असल्यासारखा तो मुलगा त्यांपैकी एका ऋषीपाशी पळत गेला . त्यानं प्रेमाने आपले हात ऋषींच्या गळ्याभोवती टाकले . त्यांना हाक मारून त्यांनी डोळे उघडावेत  म्हणून तो प्रयत्न करू लागला. ऋषींना काही ऐकू गेले असेल असं दिसून येत नव्हतं. पण मग वेळेने त्यांनी हळूहळू आपले डोळे उघडले आणि त्या लहान बालकाकाडे पाहिले . त्याला पाहून त्यांना फारच आनंद झाला आहेसे असे दिसले .             तो लहान मुलगा त्या ऋषींना म्हणाला ,''मी चाललो आहे . तुम्हालाही माझ्या बरोबर यावं लागेल ." त्याचा आवाज खूप मधुर होता . ते वृद्ध ऋषी नाही तरी कसे म्हणू शकले असते ? ते काहीच ब...
Recent posts

Shivache Vardan

          कलकत्ता हे मोठं शहर आहे ,आणि त्यातल्या एका भागांचं सिमला असं नाव आहे . कलकत्त्याच्या एका भागात राहणारी एक स्त्री -भुवनेश्वरी नावाची शिवाची रोज पूजाअर्चा करायची . ती प्रार्थना करायची ,'हे महादेवा,माझ्या मांडीवर घेण्यासाठी मला एक मुलगा दे .' भुवनेश्वरींना खूप मुली होत्या .पण आपल्याला पुत्र व्हावा अशी त्यांची खूप इच्छा होती. त्या रोज मुलासाठी  शिवाची प्रार्थना करायच्या . त्यांची  एक नातेवाईक वाराणसीला राहायची . त्यांनी तिला त्यांच्यासाठी विरेश्वर शिवाची पूजा वाराणसीत करावी , असं सांगितलं .           भुवनेशवरी गाढ श्रद्धा आणि भक्तीनं प्रार्थना करीतच होत्या .  पुत्रप्राप्ती साठी त्या खूप व्याकुळ आणि शेवटी त्यांच्या पोटी मुलगा जन्माला आला .             हिवाळा संपतानाचे ते सणासुदीचे दिवस होते . त्या वर्षी १८६३ साली बारा जानेवारीला तो सन आला . त्या दिवशी काही स्त्रिया भुवनेश्वरिंच्या घरासमोरून जात त्यांनी शंखध्वनी होत असलेला ऐकला .  आपल्या मैत्रिणीकडे काय कार्यक्रम चाललाय...