Skip to main content

Saptarshi

          आकाशात जे सात तारे आहेत ना,ते खरे तर सात महान असे ऋषी आहेत असे लोक म्हणतात ,हे ऋषी नेहमीच गाढ चिंतनात गढलेले असतात . ते ईश्वराचं ध्यान करीत असतात .
          एकदा एक छोटा मुलगा तिथे गेला . तो एक गोड मुलगा होता . पण तो किती गोड आहे आहे ते पाहायला तिथे कोणीच नव्हतं कारण त्या सातही ऋषींचे डोळे मिटलेले होते .
          अगदी ओळख असल्यासारखा तो मुलगा त्यांपैकी एका ऋषीपाशी पळत गेला . त्यानं प्रेमाने आपले हात ऋषींच्या गळ्याभोवती टाकले . त्यांना हाक मारून त्यांनी डोळे उघडावेत  म्हणून तो प्रयत्न करू लागला. ऋषींना काही ऐकू गेले असेल असं दिसून येत नव्हतं. पण मग वेळेने त्यांनी हळूहळू आपले डोळे उघडले आणि त्या लहान बालकाकाडे पाहिले . त्याला पाहून त्यांना फारच आनंद झाला आहेसे असे दिसले . 
           तो लहान मुलगा त्या ऋषींना म्हणाला ,''मी चाललो आहे . तुम्हालाही माझ्या बरोबर यावं लागेल ." त्याचा आवाज खूप मधुर होता . ते वृद्ध ऋषी नाही तरी कसे म्हणू शकले असते ? ते काहीच बोलले नाहीत . पण त्यांचा चेहऱ्यावरूनच ते शिशुबरोबर जाणार हे दिसत होतं 
            थोर संत आणि ईश्वर -अवतार अशा श्रीरामकृष्ण यांना हे सर्व सामाधातील दर्शनातून दिसले होते . त्यांनी सांगितले कि नंतर त्या ऋषीने माणसाच्या रूपात जन्म घेतला तो पुढे 'विवेकांनद' झाला . मग तो लहान मुलगा कोण होता?ते तर स्वतः श्रीरामकृष्णच होते . 
            जेव्हा श्रीरामचंद्र आले तेव्हा त्यांनी हनुमंताला सोबत आणलं. जेव्हा श्रीकृष्ण आले तेव्हा त्यांनी अर्जुनाला सोबत आणलं . आणि श्रीरामकृष्ण आले तेव्हा त्यांनी विवेकानंदांना बरोबर आणलं . 
            वेळोवेळी जगात मोठ्या विभूतिचा जन्म घेतला आहे . आयुष्यात धेय काय असावं , हे लोकांना शिकवायला येत असतात , आणि ते साध्य करण्यात यशस्वी कसं व्हावं, तसंच आयुष्यातल्या सर्व संकटावर मात कशी करावी हे ते दाखवून देतात .  

Comments

  1. 👏👏Nice
    या विभूतींचा आदर्श घेऊन एका नव्या विभूतीचा जन्म होतो..

    ReplyDelete

Post a Comment